मुंबई – नरीमन पॉईंट येथे अत्यंत मोक्याच्या जागी असलेल्या दोन भूखंडांचा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लवकरच लिलाव करणार आहे. हे भूखंड विकसित करण्याचा मेट्रोचा प्रस्ताव आहे. त्यासाठी इच्छुक बोलिदारांकडून बोली मागविण्यत येणार आहे. भूखंडासाठी किमान ५ हजार कोटी रुपयांची बोली लागणे अपेक्षित आहे. १७ फेब्रवारी रोजी लिलाव प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.या संदर्भात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची २० जानेवारी रोजी महत्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यानंतर २७ जानेवारी रोजी लिलावासंबंधी बोलिदारांना हवी असलेली माहिती आणि लिलाव प्रक्रियेची माहिती जाहीर करण्यात येईल.नरीमन पॉईंट येथील सीटीएस क्र.१९८७ आणि १९८८ हे दोन भूखंड दीर्घ मुदतीच्या भाडेतत्वावर इच्छुक बोलिदारांना देण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव गेल्या वर्षी ८ ऑक्टोबर रोजी सादर करण्यात आला होता. त्यानुसार भूखंडांची अंदाजित किंमत ५ हजार १७३ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |