दुबई – पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे कळल्यामुळे दुबईची राजकन्या शेख महरा बिंत मोहम्मद बिन रशीद अल मकतूम हिने आपल्या पतीला घटस्फोट दिला आहे. विशेष म्हणजे तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून त्यावरच तीन वेळा तलाक लिहिले आहे.
शेख महरा यांचा विवाह दहा महिन्यांपूर्वी शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम याच्याशी झाले होते. दोन महिन्यांपूर्वी महरा ने एका मुलीला जन्म दिला. आपल्या पतीचे इतर महिलेबरोबर असलेल्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने स्वतःहून आपल्या पतीला तलाक दिला आहे. आपल्या इन्टाग्राम पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, तुम्ही इतर कोणाबरोबर गुंतलेले आहात. त्यामुळे मी आपला घटस्फोट जाहीर करत आहे. तलाक, तलाक, तलाक. काळजी घ्या. तुमची पूर्व पत्नी. तिच्या या पोस्टवर कमेंटसचा पाऊस पडत आहे.