नवी दिल्ली – गेल्या जून महिन्यात छत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे बंद करण्यात आलेले दिल्ली विमानतळाचे टर्मिनल १ हे आता शनिवार १७ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे.आता इंडिगो आणि स्पाइसजेटची देशांतर्गत प्रवासी वाहतुक या नवीन टर्मिनलवरून चालणार आहे.
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडद्वारे फेज-३ ए विस्तारित प्रकल्पाचा भाग म्हणून टर्मिनल-१ सुरू करण्यात आले होते.गेल्या १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले होते.मात्र उद्घाटनानंतर तीन महिन्यातच २८ जून रोजी या टर्मिनलच्या छताचा काही भाग भरपावसात कोसळला होता. यात एकाचा मृत्यू तर आठजण जखमी झाले होते. तेव्हापासून हे टर्मिनल विमान वाहतुकीसाठी बंद होते.आता १७ ऑगस्टपासून ते पुन्हा सुरू होणार आहे.