नवी दिल्ली-नवी दिल्लीच्या नबी करीम विभागातील फर्निचर मार्केटला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे फर्निचर जळून गेले आहे. यावेळी ४४ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.दिल्लीच्या पहाडगंज मधील मुल्तानी ढांडा येथील नबी करीम च्या फर्निचर मार्केटला आज पहाटे आग लागली. पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी अग्निशमन दलाला याची सूचना देण्यात आली. यावेळी बाजारातील दुकानांमध्ये अडकलेल्या मजुरांना शेजारच्या लोकांनी तातडीने बाहेर काढल्याने मोठी जिवीतहानी टळली. अग्निशमन दलाने चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत फर्निचर, लाकूड असा लाखो रुपयांचा माल जळून भस्मसात झाला.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |