दगडूशेठ गणपतीला रसायनमुक्त द्राक्षांची आरास

पुणे – गेल्या काही वर्षांपासून द्राक्षाच्या हंगामात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात द्राक्षांची आरास केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही द्राक्षांची आरास करण्यात आली. नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या २ हजार किलो रसायनमुक्त द्राक्षांची आज मंदिरात आरास करण्यात आली.
काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवण्यात आला. ही आरास पाहण्याकरता भाविकांनी गर्दी केली होती. ही द्राक्षे भाविकांना प्रसाद म्हणून दिली जातील . अनाथाश्रम, पिताश्री वृद्धाश्रम आणि ससून रुग्णालयातील रुग्णांना वाटप केली जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top