आगरतळा – भारतात अनेक राजवाड्यांचे रूपांतर हॉटेलमध्ये झाले आहे. आता त्रिपुरातील १०० वर्ष जुना पुष्पबंता राजवाडा पंचतारांकित हॉटेलमध्ये रूपांतरित होणार आहे. यासाठी त्रिपुरा सरकारने टाटा समूहातील इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड सोबत करार केला आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.
मुख्यमंत्री माणिक साहा म्हणाले की, जागतिक दर्जाचे पंचतारांकित हॉटेल तयार करण्यासाठी टाटांच्या आयएचसीएलने त्रिपुरा सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. ताज पुष्पबंता पॅलेस असे या हॉटेलचे नाव असणार आहे. ३ वर्षात या हॉटेलचे काम पूर्ण केले जाईल. यासाठी २५० कोटीचा खर्च केला जाणार आहे.
त्रिपुरातील पुष्पबंता राजवाडा पंचतारांकित हॉटेल बनणार
