हैद्राबाद – तेलंगणातील बोगदा दुर्घटनेत रडारच्या सहाय्याने मजूरांचा ठावठिकाणा सापडल्याचा दावा चुकीचा ठरला असून या कामातील रडारतर्फे घेतलेला शोधही अयशस्वी ठरला आहे. तेलंगणात १५ फेब्रुवारी रोजी कालव्यासाठी उभारण्यात येणाऱा बोगदा कोसळून झालेल्या दुर्घटनेत ८ मजूर अडकले होते. त्यांचा अद्यापही शोध लागला नसून त्यांची जिवंत असण्याची शक्यता कमी आहे.विशेष भूवैज्ञानिक रडारच्या सहाय्याने या बोगद्यातील चार मजूरांचा शोध लागल्याचा दावा करण्यात आला होता. हा दावाही चुकीचा ठरला आहे. बचाव दलाला या ठिकाणी केवळ काही लोखंडाचे तुकडेच सापडले आहे. त्यामुळे आता रडारच्या व्यतिरीक्त इतर साधनांनीही या मजूरांचा शोध घेतला जाणार आहे. हैद्राबादच्या संशोधकांनी या बोगद्यात ग्राऊंड पेनेट्रेटिंग रडार बसवले आहेत. त्या व्यतिरीक्त इतर जागांवरही आता शोध घेतला जाणार आहे. या बोगद्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून चिखलही झाला आहे. त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.
तेलंगणा बोगदा दुर्घटना रडारतर्फे शोध अयशस्वी
