धाराशिव – तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्याच्या शिळांना तडे गेले आहेत. त्यामुळे आता या शिळांना काचा लावण्यात आल्या आहे. मंदिरातील गाभाऱ्याचे जीर्णोद्धाराचे काम पुरातत्त्व विभागाकडून सुरु आहे. मंदिर गाभार्यातील संगमरवर काढून टाकल्यानंतर शिळांना तडा गेल्याचे निदर्शनास आले. यामुळे गाभाऱ्याचे नव्याने बांधकाम करावे अशी मागणी पुजारी मंडळाकडून केली जात आहे.
मंदिर गाभाऱ्याच्या जीर्णोद्धाराचे काम मंदिर संस्थांच्या ६५ कोटी रुपयांच्या स्वनिधीतून होत असताना हा प्रकार घडल्याने पुजारी मंडळांने तुळजाभवानी मूर्ती रक्षणासाठी एक स्वाक्षरी देवीच्या गाभारा संवर्धनासाठी ही मोहीम शहरभर राबवली आहे. मंडळांने ५२४० स्वाक्षऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. गाभाऱ्याचे नव्याने बांधकाम करा, अशी मागणी या निवेदनात केली आहे. निवेदन देऊनही गाभाऱ्याचा बांधकामाचा निर्णय घेतला नाही तर आंदोलन करू, असा इशारा मंडळाने दिला आहे.
तुळजाभवानी मंदिर गाभाऱ्यातील शिळांना तडे !काचांची डागडुजी
