हैद्राबाद – तिरुपती येथील बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून विकण्यात येणारे लाडू आता पवित्र असून त्यात कोणतीही अशुद्धी नसल्याचा निर्वाळा तिरुपती येथील मंदिर ट्रस्टने दिला आहे.तिरुपती देवस्थानम बोर्ड अर्थात टीटीडीने काल समाजमाध्यमावर ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, श्रीवारी लाडू चे दिव्यत्व आणि पवित्रता पुन्हा बहाल करण्यात आली आहे. टीटीडी सर्व भाविकांच्या समाधानासाठी लाडू प्रसादाच्या पावित्र्याचे रक्षण करण्यास कटीबद्ध आहे.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती येथील प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी सदोष तूप वापरल्याचा आरोप केला होता. केंद्र सरकारनेही याबाबत अहवाल मागवला असतानाच ते लाडू पवित्र असल्याचा निर्वाळा मंदिर प्रशासनाने दिला .
तिरुपतीचे लाडू पवित्र झालेमंदिर प्रशासनाचा निर्वाळा
