चेन्नई- तामिळनाडू राज्यातील पोरुनाई किंवा थामीराबरानी नदीच्या काठी नुकतेच उत्खनन करण्यात आले.यावेळी उत्खननात सुमारे ३२०० वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात अनेक कलाकृती,भांडी आणि भित्तीचित्रांचे भग्नावशेष सापडलेले आहेत.
तामिळनाडू पुरातत्व विभागाने केलेल्या एका निरीक्षणपर अध्ययनातील माहितीनुसार जवळपास यातील ९० टक्के भित्तीचित्र सिंधुच्या खोर्यातील संस्कृतीशी मिळतीजुळती आहेत. तामिळनाडूच्या तुत्तुक्कुडी जिल्ह्यातील शिवगलाई येथे हे खोदकाम करण्यात आले.या उत्खननातून ७०० हून अधिक असामान्य कलाकृती समोर आल्या आहेत.यामध्ये गोमेद, काळ्या आणि लाल रंगांची भांडी,मातीपासून तयार करण्यात आलेले सूत काढण्याचे उपकरण, इंद्रगोप मनका,काचेच्या बांगड्या,शंख अशा गोष्टींचा समावेश आहे. जमिनीत पुरलेले १२० कलश सापडले असून यामध्ये धान्याचा भुसा सापडला आहे.