सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात आज जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवारांचा दौरा होता. या दौऱ्यात अजित पवारांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांना चांगलेच सुनावले. अजित पवारांचा यापूर्वीचा दौरा उमेश पाटील यांच्यामुळे रद्द झाला, असे कोणीतरी म्हटले, हा संदर्भ देत अजित पवारांनी चक्क कुत्र्याची उपमा देत नाव न घेता उमेश पाटलांना दरडावले होते. आता, उमेश पाटील यांनी यावर खुलासा करत मी ते वक्तव्य केलंच नव्हते, असे म्हटले आहे.
उमेश पाटील म्हणाले की, मी कुठल्याही प्रकारे अजित पवार यांनी माझ्यामुळे दौरा रद्द केला असे कुठेही बोलेलो नाही. मी जर तसे बोललो असं मला दाखवून दिले तर, तर मी सार्वजनिक जीवनातून, राजकारणातून निवृत्ती घेईन.