डोंबिवली – मुख्य गॅस वाहिकेच्या दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने महानगर गॅसकडून डोंबिवली शहराच्या विविध भागाला होणारा महानगर गॅसचा पुरवठा ८ जानेवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ यावेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.डोंबिवली शहराच्या बहुतांशी भागात महानगर गॅसकडून वाहिकेव्दारे गॅस पुरवठा केला जात आहे. डोंबिवली एमआयडीसीसह पूर्व शहराच्या भागात महानगर गॅसकडून गॅस पुरवठा केला जातो. डोंबिवली पश्चिमेत अनेक सोसायट्यांना महानगर गॅसकडून गॅस पुरवठ्याच्या वाहिका देण्यात आल्या आहेत. तेथील गॅस पुरवठा अद्याप सुरू करण्यात आलेला नाही.महानगर गॅसचे परिचालन आणि देखभाल विभागाचे साहाय्यक व्यवस्थापक आकाश जैन यांच्या स्वाक्षरीची गॅस पुरवठा बंद असल्याची पूर्व सूचनापत्र महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांकडून सोसायटी पदाधिकारी,बंगले मालक,व्यावसायिक यांना देण्यात येत आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |