डी. गुकेश बुद्धिबळाचा नवा राजा लिरेनला हरवून विश्वविजेतेपद मिळवले

सिंगापूर- भारताचा बुद्धीबळपटू दोम्माराजू गुकेशने इतिहास रचला आहे. जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून त्याने विश्वविजेतेपद जिंकले. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वविजेतेपद मिळवणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. याशिवाय वयाच्या 18 व्या वर्षी जागितक विश्वविजेतेपद मिळवणारा तो आजवरचा सर्वात तरुण बुद्धीबळपटूही ठरला आहे. जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीत 13व्या डावापर्यंत दोघांचे 6.5 इतके गुण झाले होते. आज अखेरची 14वी आणि निर्णायक लढत होती. या लढतीत डिंग पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळला. चौदा डावानंतर सर्वप्रथम ज्या खेळाडूचे 7.5 गुण होतील ते विजेता ठरणार होता. या अखेरच्या लढतीत बाजी मारत गुकेशने इतिहास घडवला.
2013 साली भारताच्या विश्वनाथन आनंदने जागतिक बुद्धिबळ विजेतेपद मिळवले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top