मुंबई- महाविकास आघाडीच्या जागावाटपाची घोषणा अजून झाली नाही तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमधल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. उद्धव ठाकरे गटाकडून सुधाकर बडगुजर (नाशिक पश्चिम), वसंत गिते (नाशिक मध्य), अद्वय हिरे (मालेगाव बाह्य) यांना एबी फॉर्म देण्यात आले. तर एकनाथ पवार ( लोहा कंधार ), के.पी पाटील (राधानगरी) यांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. तर गणेश धात्रक (नांदगाव )यांना देखील एबी फॉर्म दिल्यामुळे समीर भुजबळांच्या मविआतील पक्षप्रवेशाला पूर्ण विराम लागला आहे. दरम्यान मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याचा उजवा हात समजला जाणारा सलीम कुत्ता यांच्या पार्टीत असणाऱ्या सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नाशिक मध्य विधानसभेच्या जागेवर काँग्रेसने दावा केला होता. काँग्रेसच्या हेमलता पाटील नाशिक मध्य मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पक्षश्रेष्ठींनी आपल्याला शब्द दिल्याचा दावा हेमलता पाटील यांनी केला होता, पण आता ठाकरेंच्या शिवसेनेने वसंत गिते यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे, त्यामुळे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |