ट्रम्प यांच्या रॅलीत घुसला अज्ञात इसम

न्यूयॉर्क- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी पेनसिल्व्हेनियामध्ये काढलेल्या रॅलीमध्ये एक अज्ञात इसम घुसल्याने गोंधळ उडाला . पोलिसांनी तत्काळ घुसखोराला ताब्यात घेतले आहे.गेल्या महिन्यात पेनसिल्व्हेनियामध्ये एका रॅलीदरम्यान ट्रम्प यांच्यावर एका व्यक्तीने गोळीबार केला होता. या हल्ल्यात गोळी त्यांच्या कानाला घासून गेली होती.या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले होते.या घटनेनंतर ट्रम्प यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.त्यानंतर आता पेनसिल्व्हेनियातील जॉन्सटाउन येथे ट्रम्प यांच्या रॅलीदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने पत्रकारांसाठी राखीव असलेल्या जागेत प्रवेश केला.याठिकाणी वाहिन्यांचे कॅमेरामन आणि टीव्ही रिपोर्टर्स होते.तिथे हा इसम पोहोचला आणि त्याने मंचावर चढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपस्थित लोकांनी त्याला ओढत खाली आणले.एका पोलिसाने वीजेचा झटका देणाऱ्या शॉक गनच्या साह्याने घुसखोराला काबूत आणले.पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याचा आधीच्या हल्ल्यात अटक केलेल्या व्यक्तीशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top