ट्रम्प धोरणाचा बँकांना धसका! युरोपमधील सोने अमेरिकेत

वॉशिंग्टन- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपला आयातीवर शुल्क लावण्याचा इशारा दिल्यामुळे लंडनमधील बड्या बँका सतर्क झाल्या आहेत. ट्रम्प युरोपमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व मालावर सरसकट शुल्क लागू करतील, अशी भीती असल्याने जे पी मॉर्गनसारख्या बड्या बँका युरोपमधील आपल्या शाखांमध्ये असलेले सोने मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत आणू लागल्या आहेत.
जागतिक स्तरावर सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. ट्रम्प यांनी सर्व देशांमधून होणाऱ्या आयातीवर शुल्क लावण्याचा धडाका लावल्याने आधीच सोन्यासकट सर्वच मौल्यवान धातूंच्या व्यापाराला फटका बसला आहे. जे पी मॉर्गन, एचएसबीसी यांच्यासारख्या बड्या बँकांसमोर त्यामुळे मोठी समस्या उभी ठाकली आहे.
ब्लुमबर्ग या व्यापार विषयक संशोधन करणाऱ्या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार सार्वत्रिक निवडणुका झाल्यापासून आजपर्यंत अमेरिकेतील सोन्याची आवक दुपटीने वाढली आहे. कोरोना महामारीनंतर सोन्याच्या साठ्यामध्ये झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे.
अमेरिकेचा सोने साठा या कालावधीत वाढून 50 अब्ज डॉलरवरून 106 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. म्हणजे या कालावधीत सुवर्णसाठा दुपटीने
वाढला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top