लंडन – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमिर झेलेन्स्की हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बरोबर पुन्हा एकदा चर्चा करायला तयार आहेत. काल युरोपियन महासंघाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही तयारी दर्शवली आहे.युरोपीयन देशांच्या बैठकी नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मला असे वाटते की ही स्थिती बदलेल व अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येतील. काही सकारात्मक गोष्टीही घडणार आहेत.झेलेन्स्की यांच्या ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत मोठा वाद झाला होता. त्याबद्दल अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. रशियाबरोबरच्या युद्धात युक्रेनच्या विजयाची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांनी युद्धबंदी करायला तयार व्हावे असे मत अनेक देशांनी व्यक्त केले आहे. झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा चर्चा करण्याची तयारी दाखवली असली तरी त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या वादावर खेद व्यक्त केलेला नाही.
झेलेन्स्की ट्रम्प यांच्याबरोबर पुन्हा चर्चा करण्यास तयार
