रांची – महाराष्ट्राच्या मतदानाबरोबरच झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. झारखंडमध्ये १३ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यांचे मतदान झाले असून दुसऱ्या टप्प्यात ३८ मतदारसंघात मतदान होत आहे. यासाठीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावल्या. झारखंडमध्ये सत्तारुढ झारखंड मुक्ती मोर्चा व भाजपा यांच्यात थेट लढत आहे. काँग्रेस व झारखंड मुक्ती मोर्चा एकत्र लढत असून राजदनेही त्यांना आपला पाठिंबा दिला आहे. दुसर्या टप्प्यातील मतदानासाठी राज्यात १४ हजार २१८ मतदानकेंद्र उभारण्यात आली आहेत. या मधील ९०० मतदान केंद्र नक्षलप्रभावीत भागात आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |