जैन निर्वाण महोत्सवात स्टेज कोसळले ७ जणांचा मृत्यू ! ८० हून अधिक जखमी

लखनौ – उत्तर प्रदेश राज्यातील बागपतमध्ये जैन समुदायाच्या निर्वाण महोत्सवात आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उंच स्टेज कोसळले. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन त्यात ७ भाविकांचा मृत्यू झाला, तर सुमारे ८० हून अधिक जण जखमी झाले. स्थानिकांनी जखमी भाविकांना लाकडी स्ट्रेचरवर रुग्णालयात दाखल केले.
बागपत शहरापासून २० किमी अंतरावर बरौत तहसीलमध्ये सकाळी भगवान आदिनाथांना प्रसाद अर्पण करण्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी ६५ फूट उंच लाकडी स्टेज उभारले होते. त्यावर आदिनाथ भगवान यांची ५ फूट उंच मूर्ती ठेवली होती. भगवान आदिनाथांच्या दर्शनासाठी भाविक मचाणासारख्या पायऱ्या चढून वर जावे लागत होते. भाविकांची गर्दी वाढल्याने पायऱ्यांवर वजन वाढले. त्यामुळे संपूर्ण मचाण कोसळले.

या दुर्घटनेत तरसपाल (८०), अमित (४०), उषा (६५), विनीत आणि कमलेश यांचा मृत्यू झाला. उर्वरित तीन लोकांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. याप्रकरणी मेरठचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डी. के. ठाकूर म्हणाले की, दरवर्षी हा कार्यक्रम होतो.लाकडी स्टेज कमकुवत असल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर फक्त ३ रुग्णवाहिका आल्याचे लोकांनी सांगितले होते. अनेक जखमींना रुग्णालयात दाखल केले. परंतु, घटनास्थळाची परिस्थिती खूपच भयानक होती.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी अपघाताची दखल घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतीच्या करण्याच्या सूचना दिल्या. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top