पुणे – बारामतीहून जेजुरीकडे जाणाऱ्या एसटी बसला झालेल्या अपघातात दहा जण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील दोघांची प्रकृती गंभीर आहे.जेजुरीकडे जाणारी ही एसटी बस काल संध्याकाळी जेजुरी मोरगाव रस्त्यावरील मावडी गावाजवळ आला असता बसच्या चालकाला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याचा बसवरील ताबा सुटला व बस रस्त्यालगतच्या मोरीत कोसळली. या अपघातामुळे प्रवासी समोरच्या आसनांवर आदळले, त्यांच्या डोक्याला व शरीराला मार लागला. अपघाताचे वृत्त कळताच पोलीस व स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना नजिकच्या रुग्णालयात हलवले.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |