जालना – मनोज जरांगे पाटील शनिवार १५ फेब्रुवारीपासून पुन्हा अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या मागण्या तात्काळ मान्य करतील असे भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या मार्फत सांगितले होते. असा दावा आज पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी केला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, दस्तावेज अभ्यासासाठी अभ्यासकाची नियुक्ती करावी, गॅझेट लागू करावे, एसीबीसीच्या विषयावर निर्णय घेणे अशा पाच ते सहा मागण्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुरेश धस यांच्या मार्फत दिले होते. गोड बोलून उपोषण मागे घ्यायला लावायचे आणि नंतर एकही मागणी मान्य करायची नाही असे करून सरकारने आमची फसवणूक केली आहे. उपोषण सोडून १२ दिवस झाले तरीही एकाही आश्वासनाची शासनाने पूर्तता केलेली नाही. त्यामुळे १५ फेब्रुवारीला पुन्हा अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण करणार आहे . आज पावणेदोन वर्षापासून देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहे. मराठा आंदोलनातील तरुणांवारील गुन्हे मागे घेतले नाहीत. आता हे चालणार नाही. धनंजय मुंडे यांच्यासारखी तुमची जी टोळी आहे, तिला पण फिरू देणार नाही. आमच्या समाजाचा अपमान करणार असाल तर तुम्हालाही आम्ही सोडणार नाही.