जम्मू-श्रीनगर रेल्वे जोड प्रकल्पाची चाचणी पूर्ण

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (युएसबीआरएल) प्रकल्पाच्या कटरा-बडगाम रेल्वे मार्गावरील चाचणी आज यशस्वीरित्या पूर्ण झाली. १८ डब्यांची रेल्वे कटरा रेल्वे स्थानकातून सकाळी ८ वाजता काश्मीरच्या दिशेने रवाना झाली. या चाचणीचे पर्यवेक्षण रेल्वे अधिकारी करत होते. युएसबीआरएल प्रकल्पाची ही शेवटची चाचणी आहे. हा रेल्वे जोड ४१ हजार कोटी रुपयांच्या खर्चाने बांधली गेला आहे. त्याची लांबी ३२६ किमी आहे. यापैकी १११ किमी मार्ग बोगद्यातून जातो. या प्रकल्पातील १२.७७ किमी लांबीचा टी-४९ बोगदा सर्वात लांब आहे. रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर १३१५ मीटर लांब जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधला गेला आहे. तो नदीच्या पात्रापासून ३५९ मीटर उंच आहे. या पुलाच्या बांधकामाला २० वर्षे लागली आणि त्यासाठी १४८६ कोटी रुपये खर्च आला.
याच प्रकल्पात भारतीय रेल्वेने आणखी एक महत्वाचे यश मिळवले आहे. अंजी खड्डावरील पूल हा भारतीय रेल्वेने बांधलेला पहिला केबल-स्टेड पूल आहे. या पूलाचे मध्यभागी असलेला टॉवर १९३ मीटर उंचीचे आहे. त्याला आधार देण्यासाठी १०८६ फूट उंच टॉवरही बांधण्यात आले आहे, जो जवळपास ७७ मजली इमारतीइतका उंच आहे. हा प्रकल्प जम्मू आणि काश्मीरमधील संपर्क वाढवण्यासाठी आणि रेल्वे मार्गावर प्रवास सुलभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top