बीजिंग- चीनमधील झुहाई याठिकाणी जगातील सर्वात लांब व मोठा सागरी पूल आहे.हा पूल झुहाई,हाँगकाँग आणि मकाऊ या तिन्ही ठिकाणांना जोडतो.या पुलावर दोन्ही बाजूला तिहेरी रस्ते आहेत .
या पुलाचे खांब बांधण्यासाठी ४ लाख टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. या पुलाला भूकंपाचा फटका बसणार नाही याची काळजी घेतली आहे. ८ रिश्टर स्केलचा भूकंप आला तरीही या पुलाला कोणताही धोका नसल्याचे सांगितले जाते.झुहाई येथून हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी चार तास लागतात.मात्र आता हेच अंतर अवघ्या पाऊण तासात कापले जाते. या पुलाच्या माध्यमातून चीन हाँगकाँग आणि मकाऊवर आपले नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप केला जातो.२००३ मध्ये या पुलाची संकल्पना समोर आली. त्यानंतर प्रत्यक्षात २००९ मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात केली गेली.या पुलासाठी १७.३ अब्ज डॉलर इतका खर्च आला आहे.त्याच्या बांधणीचा खर्च हाँगकाँग, झुहाई आणि मकाऊ या तिन्हीच्या सरकारने मिळून केला आहे.