रायपूर – विदेशी मद्यावरील साडे नऊ टक्क्यांचा अतिरिक्त अबकारी कर पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय छत्तीसगढच्या सरकारने काल झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. या निर्णयामुळे राज्यात विदेश मद्याचे दर प्रति बाटली ४० ते ३ हजार रुपयांपर्यंत कमी होणार आहेत.मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी छत्तीसगढच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विदेशी मद्याबाबतच्या धोरणामध्ये सुधारणा करण्यात आली.या संदर्भात जनसंपर्क कार्यालयातील अधिकाऱ्याने सांगितले की, सन २०२५-२६ या वित्तीय वर्षासाठी विदेशी मद्याबाबतच्या नव्या धोरणाला कॅबिनेट मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानुसार विदेशी मद्यावरील साडे नऊ टक्के अतिरिक्त अबकारी कर संपुष्टात आणण्यात आला आहे.
छत्तीसगढमध्ये विदेशी दारू स्वस्त अतिरिक्त अबकारी कर केला रद्द
