*रायपुरच्या इंदिरा गांधी
कृषी विद्यापीठाचा दावा
रायपुर – छत्तीसगडमधील दुर्मिळ ‘संजीवनी’ तांदळाचे सेवन केल्यास कर्करोग बरा होऊ शकतो,असा दावा केला जात आहे.या तांदळातील औषधी गुणधर्मामुळे कर्करोगाच्या पेशी नष्ट होऊ शकतात, असे रायपुरच्या इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या आनुवंशिक आणि रोप विभागाने म्हटले आहे.
रायपुरच्या इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या आनुवंशिक आणि रोप विभागाने बस्तर येथील दुर्मिळ समजल्या जाणार्या तांदळाच्या जातीवर संशोधन केले.या तांदळाचे सेवन केल्यास कर्करोगाच्या पेशी नष्ट होऊ शकतात,असे या संशोधनात आढळले आहे.त्यामुळे या तांदळाला ‘संजीवनी’ असे नाव दिले असून त्याच्या रोपांचेही पेटंट मिळाले आहे.पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्याचा विचार आहे. रायपुरच्या या विद्यापीठातील प्रा.दीपक शर्मा यांनी ‘बीएआरसी’च्या ‘रेडिएशन बायोलॉजी अँड हेल्थ सायन्स’च्या विभागासोबत २०१६ पासून तांदळाच्या एका जातीवर संशोधन सुरू केले.या तांदळातील औषधी गुणधर्म शोधणे हा त्याचा मूळ उद्देश होता.
प्रा.दीपक शर्मा यांनी सांगितले की,संजीवनी तांदळाचे परीक्षण ‘बीएआरसी ‘मध्ये उंदरावर केले आहे.या परीक्षणात उंदरावर सकारात्मक परिणाम दिसून आले. केंद्रीय औषध संशोधन संस्थेनेही ‘संजीवनी’ तांदळात कर्करोगाविरोधात लढा देणारे गुणधर्म असल्याचे सांगितले.या तांदळाची मानवी चाचणी जानेवारीपासून टाटा मेमोरियल कर्करोग रुग्णालयात करण्यात येणार आहे.या तांदळात २१३ प्रकारची जैवरसायने आढळली असून त्यातील ७ कर्करोगविरोधी आहेत.येत्या दोन ते तीन वर्षात या तांदळाचा वैद्यकीय उपचारासाठी उपयोग होऊ शकतो.दहा दिवस दहा ग्रॅम तांदळाचे सकाळी दहा दिवस दहा ग्रॅम हा तांदूळ सकाळी उपाशीपोटी सेवन करावा.त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून कर्करोगाच्या पेशी निर्मितीस अटकाव केला जातो.