सुकमा – छत्तीसगडच्या सुकमा इथे सुरक्षादलाचे नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. पोलिसांनी त्यांचे मृतदेह आणि त्यांच्याकडील शस्त्रे ताब्यात घेतली.सुकमा जिल्ह्याच्या किस्ताराम भागात आज सकाळी ही चकमक झाली. येथील जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन नक्षलवादी ठार झाले. पोलिसांनी नक्षलवाद्यांचा घनदाट जंगलात जाऊन शोध घेतला. यावेळी जागोजागी पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. या कारवाईत पोलिसांना नक्षलवाद्यांकडील मोठा शस्त्रसाठा सापडला आहे.
छत्तीसगडच्या सुकमामधील चकमकीत २ नक्षलवादी ठार
