बिजींग- चीनमध्ये गेल्या वर्षी ॲपल फोनच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. कॅनालीस या एका संशोधक संस्थेने ही आकडेवारी जारी केली आहे. गेल्या वर्षीच्या चारही तिमाहींमध्ये ही घट नोंदवली गेल्याचे अहवालात म्हटले आहे. या काळात चीनमधील मोबाईल कंपन्यांनी आपला बाजारातील वाटा वाढवल्याचे स्पष्ट झाले आहे.
जगातील इतर देशांप्रमाणेच चीनमध्येही ॲपल फोनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. चीनमध्ये सर्वाधिक विक्री होणारा हा फोन होता. गेल्या वर्षी मात्र त्यांच्या या प्रतिमेला तडा गेला असून त्यांच्या फोनची विक्री कमी झाली आहे. त्यातही वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत तर ही घट अधिकच झाली आहे.
सध्या चीनमध्ये स्मार्ट फोनच्या बाजारात विवो या चिनी कंपनीने बाजारातील १७ टक्के वाटा उचलला असून त्या खालोखाल हुओई या चिनी कंपनीचा वाटा १६ टक्के आहे. ॲपलचा गेल्या वर्षीचा वाटा केवळ १५ टक्के राहिला. ॲपल च्या फोनमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा अभाव व चॅट जिपीटी नसल्यामुळे ही घट झाल्याचे म्हटले जात आहेत. इतर स्मार्ट फोनमध्ये या सुविधा असल्याने त्यांची विक्री वाढत आहे.
चीनमध्ये गेल्यावर्षी ॲपल फोनच्या विक्रीत मोठी घट
![](https://navakal.in/wp-content/uploads/2025/01/images-1.jpg)