सांगली- शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर मंदावला आहे. गेल्या २४ तासात केवळ दोन मिलिमीटर पाऊस पडला आहे. मात्र गेल्या चार दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी जवळपास चार मीटरने वाढली आहे.त्यामुळे गेल्या महिन्यापासून बंद झालेली वीजनिर्मिती आता पुन्हा सुरू झाली आहे.सध्या एक जनित्र सुरू झाले आहे.सध्या धरणात २०.६२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.या धरणातून १६५० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.
चांदोली धरणाच्या पाण्यावर चांदोली जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे. येथे आठ मेगावॉट क्षमतेची दोन जनित्रे आहेत. येथून १६ मेगावॅट वीजनिर्मिती होते.गेल्यावर्षी पाच वर्षातील उच्चांकी वीजनिर्मिती येथे झाली होती.धरणाची पाणी पातळी खालावल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून ही वीजनिर्मिती बंद होती.