गुलमर्गमध्ये मोसमातील पहिलाच हिमवर्षाव

गुलमर्ग – जम्मू-काश्मीरच्या गुलमर्ग व सोनमर्गसह काश्मीर खोऱ्यातील डोंगराळ भागात या मोसमातील पहिलाच हिमवर्षाव झाला. या पहिल्या हिमवर्षावाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली. या हिमवर्षावानंतर या परिसरातील तापमानात सरासरीपेक्षा ५ अंश सेल्सियस घट झाली आहे.डोंगराळ भागाबरोबरच काल जम्मू काश्मीरच्या अनेक मैदानी भागातही बर्फवृष्टी झाली. गुलमर्गमध्ये रात्रीच्या तापमानात घट झाली असली तरी इतर भागात मात्र तापमान जैसे थे आहे. येत्या दोन दिवसात काश्मीर खोऱ्यात तुरळक पाऊस आणि डोंगराळ भागात बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमवर्षावाच्या माहितीनंतर या ठिकाणी पर्यटकांनी धाव घेतली आहे. गुलमर्गच्या स्की रिसॉर्ट, अफरवात, सोनमर्ग, सिंथन टॉप येथे मोठ्या प्रमाणात पर्यंटक आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top