‘खोटं बोलण्याची राऊतांची सवयच !’ मंत्री दिपक केसरकरांची जहरी टीका

सावंतवाडी- आजगावला आमच्या जमिनी पूर्वीपासून आहेत आणि त्या व्यतिरिक्त कुठल्याही जमिनीवर मायनिंग प्रकल्प नाही. त्यामुळे असे काही खोटे बोलायचे आणि रेटून बोलायचे ही पध्दतच झाली आहे. ही नाहक बदनामी आहे.तसेच विनायक राऊतांना तर खोटं बोलण्याची सवयच आहे,अशी जहरी टीका शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर केली.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी अलीकडेच मंत्री दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आजगाव येथे नियोजित मायनिंग प्रकल्प क्षेत्रात केसरकर कुटुंबीयांची १०० एकर जमीन आहे. त्यामुळे जनतेला त्यांची भूमिका समजली पाहिजे,असा आरोप राऊतांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना मंत्री केसरकर यांनी राऊतांवर ही टीका केली.
केसरकर म्हणाले की, आजगावची कुठलीही जमीन मी मायनिंग प्रकल्पासाठी दिलेली नाही. फक्त रेडीचा प्रकल्प हा तिथल्या स्थानिक नागरिकांच्या मागणीप्रमाणे सुरू केला आणि तिथे आदर्श पध्दत राबविली जात आहे.नवीन आलेले प्रोजेक्ट जर कुणाला करायचे असतील,तर त्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेतले पाहिजे.तिथल्या पर्यावरणाच्या रक्षणाची काळजी घेतली पाहिजे.तरच असे काही होऊ शकते. आजगावबाबत माझी कुणाशीही चर्चा झालेली नाही.लोकांना प्रकल्प नको असेल तर मी त्यांच्याबरोबर राहीन.कुणीही याबाबत शंका बाळगू नये,असेही केसरकर यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top