खंडोबाच्या यात्रेला भाविकांची गर्दी

शहापूर – शहापूरपासून ६ किमी अंतरावर खंडोबाची शेलवली म्हणून प्रसिद्ध पावलेल्या गावात आज खंडोबाची यात्रा पार पडली.आमदार दौलत दरोडा यांनी खंडोबा देवाला अभिषेक घातल्यानंतर या यात्रेला सुरुवात झाली. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.गेल्या अनेक वर्षांपासून या यात्रेची परंपरा आहे.शासकीय राजपत्रिकेत १९३१ पासून या यात्रेची नोंद असून माघ शु.पौर्णिमेला मोठ्या उत्साहात उत्सव पार पाडण्याची प्रथा आजही कायम आहे. खंडोबा हे एक जागृत देवस्थान असून नवसाला पावणारा खंडोबा अशी भाविकांची श्रद्धा आहे.त्यामुळे मोठ्या भक्तिभावाने भाविक दूरवरून येथे येतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top