सेओल- उत्तर कोरियात किम जोंग उनच्या हुकूमशाही सरकारने के- ड्रामा पाहिल्यामुळे 30 अल्पवयीन विद्यार्थ्यांची जाहीरपणे गोळ्या घालून हत्या केली. या विद्यार्थ्यांवर दक्षिण कोरियात बनवलेल्या मालिका पाहण्याचा आरोप होता. कोरियन वृत्तपत्र ‘जोंगआंग डेली’च्या मते ही घटना गेल्या आठवड्यात घडली. ज्याचा तपशील आता समोर आला आहे.
दक्षिण कोरियाच्या स्थानिक टीव्ही चॅनल ‘चोसून’च्या वृत्तानुसार, या विद्यार्थ्यांनी पेन ड्राईव्हमध्ये साठवून ठेवलेली अनेक दक्षिण कोरियाई नाटके पाहिली होती. हे पेन ड्राईव्ह गेल्या महिन्यात सेऊलमधून फुग्यांद्वारे उत्तर कोरियाला पाठवण्यात आले होते. उत्तर कोरियामध्ये जपानी, कोरियन आणि अमेरिकन ड्रामावर बंदी आहे. फक्त रशियन सिनेमा किंवा सरकार जे योग्य समजते ते तिथे दाखवले जाते.