नवी दिल्ली – दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आजही दिलासा मिळाला नाही. याप्रकरणी सीबीआयने केलेल्या अटकेला केजरीवाल यांनी आव्हान दिले होते. तसेच अंतरिम जामीन देण्याची विनंती केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.आजच्या सुनावणीदरम्यान केजरीवाल यांचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी अत्यंत आक्रमकपणे युक्तिवाद केला. केजरीवाल यांना जाणून बुजून तुरुंगात डांबून ठेवण्यात येत आहे. हे मोठे कारस्थान आहे,असा दावा सिंघवी यांनी केला.केजरीवाल यांच्या याचिकेवर आज नीना बन्सल कृष्णा यांच्या न्यायासनासमोर सुनावणी झाली. युक्तिवाद करताना सिंघवी यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या वारंवार होत असलेल्या अटकेचाही दाखला दिला. नुकतेच इम्रान खान यांना एका प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र तपास यंत्रणेने दुसऱ्या एका प्रकरणात त्यांना अटक केल्याने त्यांची जामीन मिळूनही तुरुंगातून सुटका होऊ शकलेली नाही. आपल्या देशात केजरीवाल यांच्या बाबतीत असेच घडत आहे,असे सिंघवी म्हणाले.सीबीआयच्या वतीने अॅड डी पी सिंह यांनी युक्तिवाद केला. उभय पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतला .मात्र निर्णय राखून ठेवला. केजरीवाल यांच्या नियमित जामीनावरील सुनावणीसाठी न्यायालयाने २९ जुलै ही तारीख निश्चित केली आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |