नवी दिल्ली- केंद्र सरकारने मसूर डाळीवर १० टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पिवळ्या वाटाण्यावर आयात शुल्क न लावण्याच्या निर्णयाला तीन महिन्यांची म्हणजेच येत्या ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे.
सरकारने डाळींवर ५ टक्के सीमा शुल्क आणि ५ टक्के कृषी , संशोधन आणि विकास शुल्क असे एकूण १० टक्के शुल्क लावले आहे. आत्तापर्यंत सरकारने डाळीवरील आयात शुल्क मुक्त ठेवले होते. सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये पिवळ्या वाटाण्यावर आयात शुल्क न लावण्याचा निर्णय घेतला होता. यात यावर्षीच्या २८ फेब्रुवारीपर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. २०२४ मध्ये आयात केलेल्या एकूण ६७ लाख टन डाळींपैकी ३० लाख टन पिवळ्या वाटाण्याची भारताची आयात होती.