वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्व देशांवर वाढीव आयात शुल्क लावण्याचे धोरणाला जगभरातून कडवा विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने कॅनडावर दुप्पट शुल्क लावण्याची घोषणा केली खरी , पण काही तासांतच माघार घेत या निर्णयाला स्थगिती देण्याची नामुष्की ट्रम्प यांच्यावर ओढवली आहे.या संदर्भात ट्रम्प यांच्या वरिष्ठ आर्थिक सल्लागाराने प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली.कॅनडातून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या अॅल्युमिनियम आणि पोलाद या धातुंवरील आयात शुल्क २५ टक्क्यांवरून थेट ५० टक्के करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र या निर्णयामुळे अमेरिका आणि कॅनडादरम्यान व्यापारयुद्ध सुरू झाले.त्यामुळे बाजारात गोधळ आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे तूर्त आयात शुल्क वाढीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे,असे ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार पीटर नवारो यांनी सांगितले.विशेष म्हणजे अमेरिकेच्या या निर्णयाचे स्वागत करत कॅनडाच्या ओंटारियो प्रांताचे मंत्री डग फोर्ड यांनी अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या वीजेवर लादलेले वाढीव आयात शुल्क मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला
कॅनडावर शुल्क लावण्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांची माघार
