कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर दोन गावांचा संपर्क तुटला

सांगली – सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात कृष्णाकाठ परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. यामुळे दोन गावांचा संपर्क तुटला आहे. मागील २४ तासात नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने नागठाणे व शिरगाव या गावाचा संपर्क तुटला आहे. नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला आहे. बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे नागठाणे या गावाचा शिरगावशी संपर्क तुटला आहे. बुर्ली, आमणापूर, धनगाव परिसरातील नदीकाठच्या पोट मळ्यांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मळ्यांमध्ये लागवड केलेली पिकेही पाण्याखाली गेली आहेत. आमणापूर येथील स्मशानभूमीत नदीचे पाणी शिरले आहे. मागील २४ तासात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top