कर्जत – कर्जत रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक वर मुंबईकडील सरकत्या जिन्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे दोन्ही जिने २७ जानेवारीपर्यंत सुरू होण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे. या जिन्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांसह, प्रवाशांची सोय होणार आहे. कर्जत रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक दोनवर रेल्वे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी सरकत्या जिन्याची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच, फलाट क्रमांक एकवर सुरु असलेल्या सरकते जिन्याचे काम लवकर पूर्ण करून प्रवाशांसाठी उपलब्ध करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी केली.
कर्जत रेल्वे स्थानकावर सरकते जिने सुरु होणार
![](https://navakal.in/wp-content/uploads/2025/01/escalator-at-karjat-station.jpg)