कणकवली – कणकवली येथील कलमठ ग्रामपंचायत आणि सावंतवाडी वनविभागाच्या वतीने कलमठ गावात माकड पकड मोहीम राबवली.
कलमठ गावात माकडांचा उपद्रव वाढला आहे आणि शेतकऱ्यांच्या शेती-बागायतीत मोठ्या प्रमाणात माकडांचा सातत्याने वावर आहे. त्यामुळे माकडांकडून नारळ, सुपारीसह अन्य फळ, फुल झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता कलमठ गावात माकडपकड मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी केली होती. याची दखल घेऊन ग्रामपंचायत कलमठ व वन विभाग, सावंतवाडी यांच्यावतीने कलमठ गावात माकड पकड मोहीम राबवण्यात आली.
कणकवलीमध्ये माकड पकड मोहीम
