मुंबई – जागतिक बाजारातील संमिश्र संकेत आणि डिसेंबर तिमाहीचे कंपन्यांचे जाहीर झालेले निराशाजनक निकाल या कारणांमुळे आज शेअर बाजारात पुन्हा घसरण झाली.त्याआधी आठवडाभराच्या घसरणीनंतर काल शेअर बाजार सावरला होता. पण आज पुन्हा परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी लावलेला विक्रीचा जोर राहिल्याने बाजार घसरला.मुंबई शेअर वाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज ७६.८५ अंकांच्या वाढीसह ७६,०७३ अंकांवर उघडला. व्यवहारादरम्यान तो ७५,५३१ अंकांवर घसरला होता.दिवसाच्या शेवटी तो काही प्रमाणात सावरला. सेन्सेक्स ४५.७८ अंकांच्या घसरणीसह दिवसाअखेर ७५,९५१ अंकांवर बंद झाला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही आज किंचित वाढीसह उघडला होता.मात्र त्यानंतर त्यात सातत्याने घसरण होत गेली. दिवसाच्या शेवटी निफ्टी १४.५० अंकांच्या घसरणीसह २२,९४५.३० अंकांवर बंद झाला.
कंपन्यांचे निराशाजनक निकाल शेअर बाजारात पुन्हा घसरण
