नवी दिल्ली -ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीकडून विविध विभागांत काम करणाऱ्या एकंदर एक हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. कंपनीचा वाढता तोटा कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती आहे. ओला इलेक्ट्रिककडून ही पाच महिन्यांतील दुसरी नोकरकपात आहे. कंपनीने या आधी ५०० कर्मचाऱ्यांची कपात केली होती. याबाबत कंपनीचा प्रवक्ते म्हणाले की, तोटा कमी करणे, नफा वाढविणे आणि ग्राहकांना अधिक चांगल्या सेवेचा अनुभव देण्यासाठी आम्ही मनुष्यबळाची पुनर्रचना करीत आहोत.
ओलाकडून हजार कर्मचाऱ्यांची कपात
