भुवनेश्वर- ओडिशा सरकारने सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी सुट्टी मिळणार आहे. कटक येथे आयोजित जिल्हास्तरीय स्वातंत्र्यदिनाच्या समारंभानंतर माध्यमांशी बोलताना ओडिशाच्या उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी ही घोषणा केली.
उपमुख्यमंत्री प्रवती परिदा म्हणाल्या की, मासिक पाळी सुट्टी ऐच्छिक आहे, ज्या महिला व्यावसायिक काम करतात, त्या शारीरिक वेदनांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊ शकतात. हा नियम सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सलवत लागू असेल. ओडिशा सरकारने महिलांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.
भारतात वेळोवेळी मासिक पाळी रजेची मागणी होत आहे. या मुद्द्यावर अनेक नेत्यांनी वादग्रस्त विधानेही केली आहेत. तत्कालीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा अनिवार्य करण्याला विरोध केला होता. राजद खासदार मनोज कुमार झा यांनी गेल्या वर्षी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना इराणी यांनी सांगितले होते की, मासिक पाळी हा जीवनाचा एक नैसर्गिक भाग आहे आणि त्याला विशेष रजेची गरज आहे, असे मानले जाऊ नये.