ऑस्ट्रेलियात लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी

कॅनबेरा – ऑस्ट्रेलियातील १६ वर्षाखालील मुलांच्या समाजमाध्यम वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटनी अल्बानिस यांनी याचे सूतोवाच केले. यासाठी येत्या काही दिवसांत समाजमाध्यम वापरणाऱ्यांची वय तपासता येईल असे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे की, समाज माध्यमाच्या अतिरेकी वापरामुळे मुले मित्रांबरोबर राहात नाहीत. त्यांना जीवनाचा खरा अनुभव मिळत नाही. मुलांच्या मोबाईलवापराची पालकांना चिंता वाटत आहे. ते त्यांना मैदानावर खेळण्याचा आग्रह करत आहेत. मोबाईलचा वापर अती वाढल्यामुळे त्याच्यावर आता बंदी घालायलाच हवी. समाज माध्यमाचा अतिवापर समाजविघातक आहे.ऑस्ट्रेलियात गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासूनच शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. यापु्ढे विशिष्ट वयोगटातील सगळ्याच मुलांना समाजमाध्यमाचा वापर करता येऊ नये, असे तंत्रज्ञान आणण्यात येणार आहे. असा प्रयत्न जगातील अनेक देशांनी केला होता. तो तितकासा यशस्वी ठरला नव्हता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top