मुंबई – मालाड पश्चिमेतील एरंगळ येथे १२ जानेवारीला होणाऱ्या जत्रेसाठी बेस्ट प्रशासन जादा बस सोडणार आहे. सकाळी ६ वाजल्यापासून ही बस सेवा सुरु होणार असून,सकाळी २० आणि सायंकाळी ३७ अशा बस सोडणार आहे. यावेळी मालाड स्थानक (पश्चिम) ते एरंगळ आणि मार्वे बीच ते मढ जेट्टी, मार्वे बीच ते एरंगळ दरम्यान बस क्र. २७१ वर तसेच बोरीवली बसस्थानक (पश्चिम) ते मढ जेट्टी दरम्यान बस क्र.ए- २६९ वर अशा बसेस असतील. तसेच, प्रवाशांच्या मदतीसाठी मालाड स्थानक (पश्चिम), मार्वे बीच, मढ जेट्टी, एरंगळ, भाटी व्हिलेज, मालवणी आगार इ. ठिकाणी वाहतूक अधिकारी, बसनिरीक्षक यांची तसेच सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |