मुंबई – भारतातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांपैकी रिलायन्सचे जिओ आणि भारती एअरटेलने देशात उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा देण्यासाठी एलन मस्कची कंपनी स्पेसएक्स सोबत करार केला आहे. यामुळे स्पेसएक्सचा उपग्रह इंटरनेट विभाग स्टारलिंकद्वारे भारतातील ग्राहकांना वेगवान इंटरनेट सेवा देऊ शकतील .
११ मार्च रोजी या करारासंदर्भात एअरटेल आणि स्पेसएक्स या दोन्ही कंपन्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले. गेल्या अनेक दिवसांपासून एलॉन मस्क भारतात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. रिलायन्स व एअरटेलचे करार म्हणजे एलॉन मस्क यांची भारतातील महत्त्वाची आर्थिक गुंतवणूक असल्याचे म्हटले जात आहे. या करारानंतरच्या दोन्ही कंपन्या भारतातील उद्योग, शिक्षण संस्था, आरोग्य केंद्रे आणि दुर्गम भागात इंटरनेट सेवा देण्यासाठी एकत्रितपणे काम करणार आहेत. स्टारलिंक ही जगातील सर्व वापरकर्त्यांना वेगवान इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी आहे. या कंपनीकडे ७ हजारहून अधिक उपग्रहांचे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे.
एअरटेल आणि रिलायन्स स्पेसएक्सशी इंटरनेटसाठी करार
