ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील निवासस्थानी कुटुंब व कार्यकर्ते यांच्यासोबत विशेष मागवलेल्या भगव्या रंगाचा रंग उधळत भगवे धुलिवंदन साजरे केले. त्यांच्या नातवानेही यात पिचकारी मारत सहभाग घेतला.
धुलिवंदन निमित्त त्यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच नातेवाईक व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भगवा रंग हा हिंदुत्त्वाचा असून तो कोणाचा द्वेष करत नाही. ज्यांना भगव्या रंगासोबत यायचे आहे, त्यांनी आमच्या सोबत यावे. भविष्यात भगव्याकडील ओढा अजून वाढणार आहे. जे आमच्यासोबत येत आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतो. महायुतीवर जनतेने मतांचा वर्षाव केला. त्यामुळे नागरिकांच्या जीवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही विकासाचा सप्तरंग उधळत आहोत.विकासाच्या सप्तरंगात विरोधकांनीही सोबत यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे घेऊन जात असून देशाचे नाव उंच नेण्यासाठी काम करत आहेत. डबल इंजिन सरकार लोकांसाठी काम करून देश आणि राज्याचा विकास करत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भगवे धुलीवंदन साजरे केले
