लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभेची लवकरच होणार असलेली पोटनिवडणूक न लढविण्याची घोषणा आम आदमी पार्टीच्या (आप) वतीने करण्यात आली आहे. मात्र पक्षाच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.उत्तर प्रदेशमध्ये मागील बऱ्याच महिन्यांपासून आप पक्षपातळीवर निष्क्रिय राहिला आहे. आपने अद्याप राज्याच्या अध्यक्षपदाची नेमणूकही केलेली नाही. त्यातच निवडणुका न लढविण्याच्या निर्णयामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपने इंडिया आघाडीला पाठिंबा दिला होता. आप हरियाणा आणि दिल्लीतील विधानसभा निवडणुका हिरीरीने लढवित आहे. मात्र उत्तर प्रदेशमध्ये पक्षांतर्गत धुसफुसीमुळे आप या राज्यात निष्क्रिय भासत आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |