इस्रोची डॉकिंग चाचणी पुन्हा पुढे ढकलली

श्रीहरीकोटा – अवकाशातील दोन उपग्रहांना जोडण्यासाठी होणारी इस्रोची स्पेस डॉकिंग चाचणी तांत्रिक बिघाडामुळे कालही होऊ शकली नसल्याची माहिती इस्रोने एक्सवर पोस्ट करून दिली. ही चाचणी दुसर्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे.स्पेसएक्स मिशनच्या चेसर आणि टार्गेट उपग्रहांमधील अंतर ५०० मीटरवरून २२५ मीटरपर्यंत कमी करताना तांत्रिक समस्या उद्भवली. ज्या वेगाने उपग्रह एकमेकांच्या जवळ येत होते, तो वेग निर्धारित वेगापेक्षा जास्त होता. त्यामुळेच डॉकिंग प्रक्रिया थांबवण्यात आली असल्याचे इस्रोने म्हटले. या चाचणीची पुढील तारीख जाहीर केलेली नाही. यापूर्वी इस्रोने ७ जानेवारीला डॉकिंग चाचणी घेण्याची योजना आखली होती. तांत्रिक कारणांमुळे ही चाचणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलली. मात्र रात्री इस्रोला ती पुन्हा पुढे ढकलावी लागली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top