कोलकाता – इस्कॉनचे दोन हत्ती लवकरच वंतारा या अनंत अंबानी यांच्या गुजरात मधील प्राणीसंग्रहालयात जाणार आहेत. तिथे त्यांच्यासाठी एक विशेष नैसर्गिक आधिवास तयार करण्यात आला आहे. कोलकाता जवळच्या मायापूर येथील बिशपुरीया व लक्ष्मीप्रिया हे दोन हत्ती तिथे जाणार असून यातील बिशपुरीया या हत्तीने गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात आपल्या माहुतालाच मारले होते. त्यामुळे या हत्तीची विशेष काळजी घ्यायची आहे .
१८ वर्षे वयाच्या बिशपुरीया व २६ वर्षाच्या लक्ष्मीप्रिया या हत्तीणीला जामनगरच्या अंतारा येथे पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी त्रिपुरा उच्च न्यायालयाने नेमलेल्या व सर्वोच्च न्यायालयाने संमती दिलेल्या एका उच्च स्तरीय समितीची मंजुरीही घेण्यात आली आहे. बिशपुरीया या हत्तीने आपल्याच माहुताचा बळी घेतल्यामुळे या हत्तीला वेगळ्या वातावरणात ठेवण्याची गरज निर्माण झाली होती. त्यानुसार हे दोन्ही हत्ती जामनगरला पाठवण्यात येणार असून तिथे त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. हत्तींच्या नैसर्गिक अधिवासाप्रमाणेच तेथील परिसर तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी ते आयुष्यभर राहणार आहेत.