मुंबई – मुंबईत आज पार पडलेली टाटा मॅरेथॉन स्पर्धेतील प्रमुख ४२.१९५ किलोमीटरची शर्यत आर्ट्रेरियाच्या बरहेन टेस्फे याने २ तास ११ मिनिटे ४४ सेकंदात पूर्ण करत पहिला क्रमांक पटकावला. भारतीय पुरुषांच्या श्रेणीमध्ये अनिश थापा याने २ तास १७ मिनिटे २३ सेकंदात ही शर्यत पूर्ण करत भारतीय खेळाडूंमध्ये पहिला क्रमांक पटकावला. केनियाच्या जॉयसी चेपकोमई हिने २ तास २४ मिनीटे ५६ सेकंदात ही शर्यत पूर्ण करत महिलांमधून पहिला क्रमांक पटकावला. पुरुषांच्या प्रमुख मॅरेथॉन विजेत्यांपैकी पहिल्या तिघांना अनुक्रमे ५० हजार, २५ हजार व १५ हजार अमेरिकन डॉलरचे रोख पारितोषिक देण्यात आले.मुंबईत झालेल्या टाटा मॅरेथॉन स्पर्धेत विविध श्रेणींमध्ये तब्बल ६५ हजार धावपटूंनी व सर्वसामान्यांनी भाग घेतला. यामध्ये दिव्यांगासह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |