नवी दिल्ली – नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर काल झालेल्या चेंगराचेंगरीचा एक वेगळा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमध्ये एक महिला पोलीस कॉन्स्टेबल आपल्या एक वर्षाच्या बाळाला सोबत घेऊन कर्तव्य बजावताना दिसत आहे. आईपणाची जबाबदारी आणि कर्तव्य याचा समतोल साधणाऱ्या या महिला कॉन्स्टेबलचे नेटकरी मनोमन दाद देत आहेत.रेल्वे पोलीस दलात असलेल्या या महिला कॉन्स्टेबलचे नाव रिना असल्याचे समजते. महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांची नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर अचानक गर्दी वाढल्याने गेल्या शनिवारी चेंगराचेंगरी झाली होती. त्यात सुमारे अठरा प्रवाशांचा बळी गेला. तर अनेक जण गंभररित्या जखमी झाले.ही घटना घडली तेव्हा रिना रेल्वे स्थानकावर तैनात होत्या. त्यांच्या खांद्यावरील बेबी बॅगमध्ये चिमुरडे बाळ होते. बाळाला सांभाळत रिना गर्दीचे नियंत्रण करीत होत्या.घटनेच्या दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकला.
आपल्या चिमुरड्या बाळाला सांभाळत महिला कॉन्स्टेबलने बजावले कर्तव्य
